बार्शीत बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; चौघांवर गुन्हा दाखल तर एकजण अटक

प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार
बार्शीत बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; चौघांवर गुन्हा दाखल तर एकजण अटक

आबासाहेब बारबोले

बार्शी :बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बार्शी शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला यश आले आहे.

बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल परिसरात बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन विक्री करून फसवणूक केल्या प्रकरणी अमित सुभाष वायचळ रा जावळी प्लॉट बार्शी निखिल राजकुमार सगरे रा बळेवाडी ता बार्शी विकास उर्फ बप्पा काशीनाथ जाधवर रा जावळी प्लॉट बार्शी भैय्या इंगळे रा येडशी ता जि उस्मानाबाद अशी दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी अमित सुभाष वायचळ हा पोलिसांच्या हाती लागला असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे.

 

अधिक माहिती अशी की महेश शामराव पवार रा राऊत चाळ यांनी दि ७ मे रोजी जवळच्या नातेवाईकाला रेमडेसिव्हर इंजेक्शन पाहिजे म्हणून निखिल सगरे हा ब्लॅकने इंजेक्शन विक्री करत असल्याचे समजले.म्हणून राऊत यांनी प्रसाद कुलकर्णी नावाच्या मित्राच्या फोनवरून सगरे यास संपर्क साधून इंजेक्शन ची मागणी केली. त्यावेळी पन्नास हजार रुपयांला दोन इंजेक्शन मिळतील म्हणून सगरे याने सांगितले व पैसे गुगल पे ने पाठवण्यास सांगितले . त्यानुसार पन्नास हजार रुपये सगरे याच्या अकाउंटवर पाठवल्या नंतर रात्री साडेआठ नंतर इंजेक्शन आणून दिली.

 

राऊत यांनी इंजेक्शन वरील टोल फ्री क्रमांक लावला असता सदरचा फोन अवैद्य सांगत होता म्हणून इंजेक्शन च्या बाबतीत संशय आला म्हणून सदर इंजेक्शन परत घेऊन पैसे परत दे म्हणून सगरे यास सांगितले. त्यावर हे इंजेक्शन मी माझा मित्र अमित वायचळ यांच्याकडून आणून दिले आहेत असे सांगितले व अमित वायचळ याने पन्नास हजार रुपया पैकी पंधरा हजार रुपये परत दिले उर्वरित पैसे येडशी येथील इंगळे कडून आणून देतो म्हणून सांगितले.

 

मात्र लवकर पैसे दिले नाहीत.त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर पवार यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी याबाबत माहिती घेऊन याबाबत यअन्न व औषध प्रशासन विभागाला कळवले.

त्या तक्रारीची चौकशी करून औषधं निरीक्षक नामदेव भालेराव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल ननावरे करत आहेत

ग्लोबल न्युज नेटवर्क: