आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोडं भान ठेवाव, पुन्हा रामदास कदमांनी सुनावले

 

आदित्य ठाकरे आमदारांना गद्दार म्हणत आहे. त्यांनी बोलताना थोड भान ठेवलं पाहिजे असे शिंदे गटात सामील झालेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम म्हणाले. त्यांचे वय 32 वर्ष आहे, माझे पक्षासाठी योगदान 52 वर्ष आहे. त्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी जो बोलतो ते करुन दाखवाव असेही कदम म्हणाले.

पुढे बोलताना कदम म्हणाले की, हे आमदारांचे बंड नाही हा उठाव आहे. मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंद करतो, तसेच आमदारांचे देखील अभिनंदन करतो असे रामदास कदम म्हणाले. पुढची अडीच वर्ष अशीच गेली असती तर शिवसेनेचे 10 आमदार देखील निवडून आले नसते असेही ते म्हणाले.

1995 ला सेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असतानाही मला मंत्रीपद मिळाले नाही. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो म्हणून मला मंत्रीपद मिळाले नसल्याचे मत शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलं.

रामदास तुझ्यामुळं माझ्या घरात भांडणे चालली असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते.एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी हे विधान केले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं.

बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगतो की, अनिल परब यांच्याविरोधात मी काही केलं नाही. त्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम म्हणाले. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यांचा आदेश मान्य करणे आम्हाला भाग पडत होते.

मला राज ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल : अमित ठाकरे

 

Team Global News Marathi: