महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरु आहे. याबाबत अमित ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता, “मला राज ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल,” असं सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.
महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान अंतर्गत अमित ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी सांगितले की, संघटनात्मक काही बदल देखील केले जातील. या दौऱ्यादरम्यान ठिकाणच्या विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतोय. त्यांच्या अडचणी जाणून घेतोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य सोपं करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे. मात्र यावेळी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष एकीकडे सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मनसेचे नेते अमित ठाकरे सक्रिय झाले असून महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठका संवाद सुरु केला आहे.
या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दाखल झाले. अमित ठाकरे कल्याणमधील स्प्रिंग टाईम क्लबमध्ये विद्यार्थी, मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
लोकं बंडखोरांची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत – संजय राऊत
सेनेच्या संघर्ष काळात आता तेजस ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री?