ममता बॅनर्जींच्या सरकारमधील या मंत्र्याला ईडीकडून अटक

 

सध्या देशातील विविध राज्यात ईडीकडून कारवाई केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचं सत्र सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीनं अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांनी चौकशी सुरु होती. चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली आहे. तसेच ईडीने त्यांच्या जवळच्या मित्रांकडून करोडो रुपयांची रोकड आणि सोने जप्त केले आहे.

दरम्यान, 22 जुलै रोजी ईडीने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळात मंत्री असणारे पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ही छापेमारी सुरुच आहे. यामध्ये पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्या घरातून ईडीने 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली होती.

अशातच ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिता यांनाही ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक तासांपासून ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंत्री चॅटर्जी देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोडं भान ठेवाव, पुन्हा रामदास कदमांनी सुनावले

मला राज ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल : अमित ठाकरे

Team Global News Marathi: