आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्या शिंदे गटाची एन्ट्री, वरळीतील माजी नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात ?

 

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षपाठोपाठ सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून माजी नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.

वरळीचे माजी नगरसेवक संतोष खरात यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॉर्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे.तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.

Team Global News Marathi: