नागपुरात दारूसाठी पैसे न दिल्यानं पोराने केला आईचाच खून

 

नागपूर | नागपुरातील यशोधरानगरात रविवारी एक थरारक घटना घडली असून बेरोजगार आरोपीला स्वतःच्या आईपेक्षा नशा देणारी दारू जास्त महत्त्वाची वाटली अशातच आईने दारुसाठी पैसे न दिल्याने संतापून त्याने आईवरच विळ्याने वार केले. अक्षरश: राक्षसी कृत्य करत त्याने आईचाच गळा चिरत तिचा खून केला. त्यानंतर दारुची नशा उतरल्यावर त्याने स्वतःच पोलीस ठाणे गाठलं आणि केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.

गोविंद संतराम काटकर असे आरोपीचे नाव असून विमलाबाई संतराम काटकरअसे दुर्दैवी मृत आईचे नाव आहे. आरोपी गोविंदला दारूचे व्यसन असून त्याच्या या सवयीमुळे कुणीही त्याला जास्त दिवस कामावर ठेवत नाही. काही वेळा मजूर म्हणूनही तो काम करतो. त्याच्या कुटुंबात आईशिवाय मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ सुमारे दहा वर्षांपासून पत्नी आणि मुलांसह कळमना येथे राहतो. दारूच्या व्यसनामुळे गोविंदला काही दिवस काम मिळत नव्हते. तो आई विमलाबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. पैसे न दिल्याने गोविंद त्याच्या आईलाही मारहाण करायचा.

रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदने विमलाबाईंकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुरुवातीला आईने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. गोविंदकडून सतत छळ होत असल्याने त्यांनी घरच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गोविंदला राग अनावर झाला आणि त्याने घरातील विळा घेत आईकडे धाव घेतली. त्याने विळ्याने आईचा गळा चिरला. यात विमलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि आचके देत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आईची हत्या केल्यावर गोविंद थोड्यावेळाने घराबाहेर निघाला. दारूच्या नशेत तो दिवसभर भटकला. सायंकाळी पाचच्या सुमारास नशा उतरल्यावर त्याला नेमके काय करून ठेवले हे लक्षात आले. त्याने स्वतःच यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्याने खून केल्याचे सांगितले. एकूण प्रकार ऐकल्यावर त्यांनादेखील धक्काच बसला,

Team Global News Marathi: