राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन

 

मुंबई | महाराष्ट्राचे नवे इलेक्ट्रिक कार धोरण मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरण पूरक असा पर्याय आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इलेक्ट्रिक कार हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांनाही परवडणारा आणि सोपा हवा. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारला उत्तम पर्याय म्हणून नागरिक इलेक्ट्रिक कार स्वीकारतील. या सर्वांसाठी राज्य सरकारचे नवं धोरण अतिशय महत्वाचं आहे. याच संदर्भात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे पत्रकार परीषद घेऊन धोरण जाहीर केल आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण अंमलबजावणी खर्च ९३० कोटी रुपये अपेक्षित आहे. हा खर्च टप्याटप्याने पुढील ४ वर्षात होण्याची शक्यता आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी प्रस्तावित आहे. हा निधी जुन्या वाहनावरील हरित कर आणि विविध इंधनावरील उपकर सारख्या वेगवेगळ्या माध्यमातून एकत्रित करण्यात येईल. नवीन निवासी प्रकल्प विकासकांना २०२२ पासून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेसाठी सज्ज पार्किंग खरेदी करण्याचा पर्याय देणे आवश्यक असेल.

Team Global News Marathi: