शिवसेनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवा ; उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

 

सातारा | . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर दि १२ ते २४ जुलै या दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे . या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सातारा जिल्ह्यात करण्यात आला आल्यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्राशिक्षण मंत्री सातारा जिल्ह्यात बोलत होते.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत . शिवसेनेच्या कल्याणकारी योजना आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा, असे आवाहन उच्च व तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सातारा जिल्ह्यात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, ” शिवसेनेने गेल्या पाच दशकाच्या वाटचालीत मराठी माणसाची अस्मिता जपत आपले राजकीय अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे . शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा शिवसेना आजही जपत असून सर्वसामान्य माणसांचे हित जपणे हाच विकासाचा खरा मंत्र आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवभोजन थाळी सारखे कौतुकास्पद उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविले.

आज पक्ष संघटनेची मजबुती व कार्यकर्ता सक्षमीकरणासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे . शासनाच्या योजना व पक्षाची उद्दिष्टे शिवसैनिकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवयाची असून तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसैनिकांनी पोहचण्याचे आवाहन त्यांनी केले.

Team Global News Marathi: