अभिनेत्री प्राजक्ता माळीनं राज्य सरकारला केली कळकळीची विनंती

 

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत सोशल मीडियावर सक्रिय असतेच. ती आपले विविध फोटो व व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय तिच्या आगामी प्रोजक्टबद्दल माहिती देखील ती शेअर करत असते. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं थेट सरकारला साकडं घालत सरकारला कळकळीची विनंती केली आहे.

प्राजक्ताचा हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, लहान तोंडी मोठा घास.पण आता बोलायला हवे.सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते.तरी आमची विनंती विचारात घ्यावी.प्राजक्त माळी या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, नुकताच आमच्या पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे.

याशिवाय मराठी सिनेमांना देखील तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र आता कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. मात्र सिनेमागृह असतील किंवा नाटकाचे प्रयोग याला आजही 50 टक्के उपस्थितीचा नियम आहे. त्यामुळे हा नियम शिथिल करून शंभरे टक्के उपस्थितीचा नियम करावा, अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे. आमच्या विनंतीचा विचार करावा अशी मागणी प्राजक्ताने या व्हिडिओमधून केला आहे.

Team Global News Marathi: