अमरावती पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणांचा राडा, पोलिसांवर केले गंभीर आरोप

 

अमरावती | मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी, ‘पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली, याबद्दल मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार, असा पवित्राच नवनीत राणा यांनी घेतला आहे.

या संदर्भात समोर आलेली माहिती अशी की, राजापेठ पोलीस ठाण्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या असता त्यांना युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांसोबत भेटण्यास पोलिसांनी मनाई केली. या घटनेनंतर त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

‘पोलिसांनी निर्दोष लोकांना अटक केली, गुन्हेगाराप्रमाणे पोलीस मारहाण करत आहे व रवी राणा यांचं नाव सांगा असा दबाव पोलीस आणत आहे’ असा आरोप नवनीत राणा यांनी केला, तर मारहाणीची तक्रार मी मानवधिकार आयोग व न्यायालयात करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसोबत बाचाबाची दरम्यान, राजापेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली होती.

Team Global News Marathi: