अभिनेता विकीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली कतरिना, मारली सर्वांसमोर मिठी

 

बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला ब्रिटिश जनरलकडून घेतल्याची कहाणी दर्शविण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशलने चित्रपटामध्ये उधम सिंग यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंह यांचे जीवन दाखवण्यात आले असून, इंटरनेटवर चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे.

‘सरदार उधम’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग जवळच्या व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पोहोचले. तिथे अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​यांनी देखील एकत्र या स्क्रिनिंगला हजेरी लावली. काही दिवसांपासून कतरिना अभिनेता विकी कौशलला डेट करत असल्याची चर्चा पसरली होती. अशातच विकी कौशलला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री कतरिना कैफने न चुकता हजेरी लावली.

काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिना हे बॉलिवूडमधील कपल असल्याचा खुलासा अभिनेता हर्षवर्धन कपूरने एका चॅट शोमध्ये केला होता. लॉकडाउनमध्ये जेव्हा विकी कतरिनाला तिच्या घरी भेटायला गेला, तेव्हासुद्धा त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सिद्धार्थ-कियाराच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही विकीने कतरिनासोबत हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याच्याही चर्चा होत्या.

Team Global News Marathi: