पुढीलवर्षी अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक, मात्र सध्या सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष राहणार

 

नवी दिल्ली | काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज पार पडली असून या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाबाबतची चर्चा झाली. चर्चेनंतर सोनिया गांधी याच काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. तसेच नवीन अध्यक्षाची निवड पुढीलवर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये करण्यात येणार असल्याचं ठरलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असे म्हटले जात आहे की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

या निवडणुकांमुळे सध्या संघटनात्मक निवडणूक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक घेऊन पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल आणि ती व्यक्ती आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपाटून मारखावा लागला होता. या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर पक्षाची कमान सोनिय गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून आपल्या हाती घेतली. मात्र, असे असताना पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आहे असी मागणी पक्षातील नेत्यांकडून वारंवार होत होती. यासोबतच काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली होती. तसेच याच मुद्दयावरून विरोधकांनी सुद्धा हल्ला चढवला होता.

Team Global News Marathi: