लॉक डाऊनमध्ये गरिबांचा मसीहा बनलेल्या अभिनेता सोनू सूदने घेतला हा मोठा निर्णय

लॉक डाऊनमध्ये गरिबांचा मसीहा बनलेल्या अभिनेता सोनू सूदने घेतला हा मोठा निर्णय

लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. तसेच त्याच्या मदत करण्याचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. त्यात आता त्याने आपल्या चित्रपट सृष्टीशी निगडित मोठा निर्णय घेतलेला आहे.

यापुढे आपल्या पुढील चित्रपटांमध्ये खलनायकांच्या भूमिका साकारण्यास साफ नकार दिला आहे. त्याला बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकांचेच रोल साकारण्याची विनंती केली जात होती. मात्र या सर्व चित्रपटांना त्याने नकार दिला आहे. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे.

तसेच त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा त्याने फार जवळून अनुभव घेतला. या अनुभवामुळे लोकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींबाबत त्याच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. परिणामी यापुढे केवळ नायकांच्याच भूमिका साकारण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: