नव्या कृषी कायद्यामुळे सर्वाधिक फायदा शेतकर्‍यांचा, पंतप्रधान मोदींचा दावा

‘नवीन कृषी कायदे काय रातोरात आले नाहीत, कृपया शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ग्लोबल न्यूज: कृषी कायद्यावरून शेतकरी आंदोलनाची धार वाढतच आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा शेतकर्‍यांच्याच फायद्याचा असल्याचे म्हटले आहे.

कृषी कायद्यामधील शेती कंत्राटाबद्दल खोटे पसरवण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. देशात शेती कंत्राट नवीन नाही, केंद्र सरकार नव्याने शेती कंत्राट पद्धत आणत नाही, अनेक वर्ष ही पद्धत सुरू आहे असे मोदी म्हणाले.

 

तसेच पंजाबच्या शेतकर्‍यांच्या शेतीत जास्तीत जास्त गुंतवणुक व्हावी ही माझ्यासाठी आनंदायक बाब आहे. पूर्वीच्या शेती व्यवसायात शेतकर्‍यांना मोठी जोखीम पत्करावी लागत होती. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकर्‍यांना नफा मिळवण्यासाठी कायदेशीत तरतूद करण्यात आली आहे.

शेती कंत्राटात सर्वाधिक फायदा हा शेतकर्‍यांचा आहे. कंत्राटदाराला आपल्या वचनातून आणि जबाबदारीतून पळता येणार नाही. शेती कंत्राटात फक्त उत्पादनाची तरतूद आहे. शेतकर्‍याची जमीन त्याच्याकडेच राहील अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. नव्या कायद्यानुसार कंत्राट आणि जमिनीचा काहीच संबंध नसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

नैसर्गिक संकट जरी आले तरी शेतकर्‍यांना ठरवलेले पैसे मिळणार, नव्या कायद्यानुसार जर कंत्राटदाराला जास्त फायदा झाला तर शेतकर्‍यांनाही या नफ्यातील काही हिस्सा मिळणार असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: