कॅन्सर रुग्णाला बरं करतो सांगून अडीच लाखांची फसवणूक करणाऱ्या मनोहर मामावर गुन्हा दाखल !

 

काही दिवसांपासून श्री संत बाळूमामा यांचे देवस्थान विश्वस्त आणि मनोहर मामा यांच्यातील वाद वाढताना दिसून येत होते. मनोहर मामा यांच्यावर अनेकांनी फसवणुकीचा आरो लावला होता. त्यातच आता कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असं सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशीकांत खरात यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार तक्रारदार खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असं सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले.

तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगणमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या आरोपांखाली तक्रारदाराने मनोहर मामा आणि त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Team Global News Marathi: