अभिनेता साई धरम तेजच्या गाडीला भीषण अपघात !

 

साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेता साई धरम तेज यांच्या स्पोर्ट बाईकचा शुक्रवारी रात्री मोठा अपघात झाला आहे. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. साई धरम तेज आपल्या बाईक वरून जात होता त्या दरम्यान त्याचा हा अपघात झाला. शुक्रवारी तो बाईकवरून रात्री दुर्गमचेरुवु केबल ब्रिज पासून जात होता त्यावेळी त्याचा हा मोठा अपघात झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार साई धरम तेज एक स्पोर्ट्स बाईक चालवत होता. मात्र गाडी चालवत असताना हेल्मेट घातल असल्यामुळे त्याच्या डोक्याला इजा झाली नाही. मात्र इतरत्र त्याला इजा झाल्या आहेत. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्या उपचार सुरु होते.

मात्र त्याची स्थिती सुधारल्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. साई धमर तेजच्या टीमने सांगितल की, ‘साई आता ठीक आहे आणि तो रिकवर होतआहे. काळजीचं कारण नाही. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी ऑपोलो रुग्णालयात दाखल केलं आहे.

Team Global News Marathi: