बंद ‘करुन दाखवलं’ याचे श्रेय घेणार का?,

 

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करताना दिसून आले आहेत. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेनानतंर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यातच आता आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निशाणा साधला आहे.

 

आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वताच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’ चीही जगभर वाहवा ‘मिळवून’ घेतात, असे म्हणत केलेल्या कामाचे श्रेय घेता, मग बंद पडलेल्या योजनांचं काय? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

 

 

जे खरे कोविड वॉरीअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात?आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पुर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.

 

 

 

Team Global News Marathi: