अबब भाजप नगरसेविकेच्या हॉटेलमध्ये खुलेआम कुंटणखाण, पोलिसांचा छापा !

“महिलाओं के सम्मान में बीजेपी मैदान में” म्हणत नुसता आव आणणाऱ्या भाजपा महिला नगरसेविकेच्या मालकीच्या असलेल्या हॉटेलमध्ये लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली कुंटणखाना सुरु असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकून पाच मुलींची सुटका केली.तर दोन दलालांना अटक केली असून या घटनेमुळे महिलांच्या संरक्षणाचा आव आणणाऱ्या भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.

मीरा-भाईंदर मनपा हहद्दीतील शहरात बहुतांश ठिकाणी सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे हॉटेल, बीयर बार , लॉजिंग आणि ऑर्केस्टा बार मोठ्या प्रमाणावर आहेत. नगरसेविका यांच्या मालकीच्या मीरा रोडयेथील हॉटेल मेरियाड (बिझनेस हॉटेल आणि रेस्टॉरंट ) या लॉजिंग- बोर्डिंगमध्ये मुलींचा देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने सापळा रचत छापा टाकला.

दलालामार्फत मुली पुरवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी रामरतन करवा(30) व परमबत चामारिया (42) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या हॉटेलमधून पाच मुलींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी सुटका केलेल्या मुली मॉडेलिंग व भोजपुरी चित्रपटात काम करायच्या. तर काहीजणींनी मालिकांमध्येही भूमिका केल्याची माहिती आहे. मात्र सध्या त्यांना कोणतेही काम नाही. त्यामुळेच त्यांनी हा मार्ग पत्करला असल्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: