ऑक्सिजनशिवाय लोकांना तडफडून मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज’ – स्वरा भास्कर

सध्या संपूर्ण देशाबाशरत कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे . त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वादहत असलेली रुग्णसंख्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक विदेशी प्रसार माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. आता त्या पाठोपाठ अभिनेत्री स्वरा भासकर हिने सुद्धा पंतपराधन नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे बनत चाललेल्या विदारक परिस्थितीमुळे द प्रिंट वृत्तपत्राचे शेखर गुप्ता यांनी सरकार विरोधात ट्वीट करत पंतप्रधानांना करोनासाठी नवीन यंत्रणा आणण्याचा सल्ला दिला होता. शेखर यांनी ट्वीट करत लिहिलं, ‘जर पंतप्रधानांना देश सुखरूप ठेवायचा असेल तर त्यांना नवीन यंत्रणा आणण्याची गरज आहे. शेखर गुप्ता यांच्या ट्वीटनंतर स्वराने लिहिलं की, ‘भारताला एका नव्या पंतप्रधानांची गरज आहे. जर भारतीयांना त्यांच्या प्रियजनांना असं ऑक्सिजनसाठी तडफडून मरताना पाहायचं नसेल तर!’ असे ट्विट तिने केले आहे

या ट्वीटनंतर ट्विटरवर #SwaraBhaskar हा हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्वराला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तर एका नेटकाऱ्याने लिहिलं, ‘माफ करा पण हे २०२४ च्या आधी नाही होऊ शकत. आता तर यांनाच सहन करा असं लिहिलं आहे. यापूर्वी सुद्धा स्वराने पश्चिम बंगाल निवडणुकीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

Team Global News Marathi: