“आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार” – संजय राऊत

 

आमदारांपाठोपाठ आता बंडखोरांमध्ये नगसेवकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबवली आणि पुणे येथील नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होत आहे.मात्र, हे नगरसेवक नाहीतर माजी नगरसेवक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. या महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे.

मात्र आता शिवसेनेतून जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामे आहे. त्यामुळे वाघ आता गरुड झेप घेणार आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार, असे म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामं आहे. त्यामुळे वाघाच्या झेपेत महाराष्ट्र कवेत घेण्यासाठी शिवसेना पुढे आली आहे, असं म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

Team Global News Marathi: