आता पुन्हा महेश बाबू हिंदी चित्रपटांबद्दल जे म्हणालाय ते पाहून चीडच येईल

 

दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड प्रसिद्धी असलेला अभिनेता महेश बाबू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महेश बाबूनं त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात फार आधीपासूनच केली. पाहता पाहता त्यानं प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केलं. पण, या साऱ्यामध्ये हल्लीच त्यानं असं वक्तव्य केलं की, पाहणारेही हैराण झाले.

हिंदी कलाजगताविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता महेश बाबू आता मात्र तोंडावर पडला आहे. कारण, ‘सरकारु वारी पाटा’ या त्याच्या चित्रपटाची वाईट अवस्था झाली आहे. दणक्यात ओपनिंग मिळालेला हा चित्रपट दुसऱ्या दिवशी दणकून आपटला आहे. ज्यामुळं आता आपणही हिंदी चित्रपट करण्यास तयार असल्याचा इशाराच महेश बाबूनं दिला आहे.

‘मेजर’ च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान या अभिनेत्यानं स्वत:च पायावर धोंडा मारून गेत हिंदी कलाजगताला मी परवडणार नाही असं म्हटलं आणि एक नवं वादंग माजलं. पण, आपण हे मस्करीत बोललो अशी सारवासारव आता तो करताना दिसत आहे. नव्या चित्रपटाच्या फ्लॉपनंतर आपल्या चुकीची जाणीव महेश बाबूला झाली असंच दिसत आहे. कारण सूत्रांच्या माहितीनुसार हिंदी चित्रपटांशी माझं काहीच वैर नाही आणि मी त्या चित्रपटांमध्येही काम करण्यासाठी तयार असल्याचं तो म्हणाला आहे.

Team Global News Marathi: