आमची संख्या आणखी वाढणार ; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

 

“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणे महत्त्वाचे आहे.” असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले.

“शिवसेनाप्रमुख नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने यश प्राप्त केले. आता या गद्दारीमुळे संख्या कमी झाली असेल, परंतु याच गद्दारीमुळे आमची संख्या आणखी वाढणार आहे. आशिष शेलार तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. शिवसेना एक स्वतंत्र आणि समाजकारण करणारा पक्ष आहे. शिवसेना वेगवेगळे मित्र जोडते. कधी न होऊ शकणारी युती शिवसेनेने केल्यामुळे तसेच वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर आल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे यांचा थयथयाट सुरू आहे.” असे ते म्हणाले.

“मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करा, मग पाहू जनता तुम्हाला निवडून देते की आम्हाला? ते तर करत नाहीत आणि मग या बाकीच्या गप्पा करतात. आता दरोडा टाकण्याचे काम नाही तर काय चालू आहे? G२०निमित्त मुंबई महापालिकेने एक ध्वज २४ हजार रुपयांना खरेदी केला. ध्वज खरेदीतही मुंबई महापालिकेत घोटाळा झाला असून याची चौकशी झाली पाहिजे.” असे ते म्हणाले.

 

Team Global News Marathi: