भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित- वंचित आघाडी

 

उद्धव ठाकरे आणि प्रकाश अमेदकर यांनी नव्या शिवशक्ती आणि भीमशक्ती ईटीची घोषणा करून विरोधकांच्या अडडचणी वाढवल्या आहेत अष्टाचात या युतीवर शिंदे गटासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

कुणीतरी खरंच म्हटलं आहे किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुध्दा त्यांचे लिव्ह इन रिलेशन आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते आहे हे स्पष्ट दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे मराठी मुस्लिम करत मुस्लिमांच्या मागे लागतात. मग कधी वंचितच्या मागे लागतात. आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी आहे अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

पुढे राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, त्यांनी मोर्चा काढला होता त्याचे काय झाले? त्यांनी आंदोलन केले होते. जनतेने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे एका संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व स्वतः राज्यपाल यांनी केले आहे. ते आज स्वतःच जाऊ इच्छितात म्हटल्यावर त्याच्यावर क्रेडिट घेण्याचा धंदा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे हे वाक्य आहे.

मला वाटते हा कार्यक्रम अराजकीय होता. त्यांच्याही पक्षाचे लोक होते. उद्धवजी स्वतः आले नाहीत. ते स्वतः मात्र अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांबरोबर गुलूगुलू करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचे राजकारण पाहत आहेत. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांच्या भगवाधारी तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर मिळतील की, नाही यासाठी एका विशिष्ट गटाच्या मताचं लांगुलचालन करण्यासाठी उद्धवजी कार्यक्रमाला आले नाहीत असा आमचा कयास आहे.

 

Team Global News Marathi: