Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

आमची संख्या आणखी वाढणार ; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

by Team Global News Marathi
January 24, 2023
in राजकारण
0
आमची संख्या आणखी वाढणार ; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

 

“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणे महत्त्वाचे आहे.” असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले.

“शिवसेनाप्रमुख नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने यश प्राप्त केले. आता या गद्दारीमुळे संख्या कमी झाली असेल, परंतु याच गद्दारीमुळे आमची संख्या आणखी वाढणार आहे. आशिष शेलार तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. शिवसेना एक स्वतंत्र आणि समाजकारण करणारा पक्ष आहे. शिवसेना वेगवेगळे मित्र जोडते. कधी न होऊ शकणारी युती शिवसेनेने केल्यामुळे तसेच वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर आल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे यांचा थयथयाट सुरू आहे.” असे ते म्हणाले.

“मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करा, मग पाहू जनता तुम्हाला निवडून देते की आम्हाला? ते तर करत नाहीत आणि मग या बाकीच्या गप्पा करतात. आता दरोडा टाकण्याचे काम नाही तर काय चालू आहे? G२०निमित्त मुंबई महापालिकेने एक ध्वज २४ हजार रुपयांना खरेदी केला. ध्वज खरेदीतही मुंबई महापालिकेत घोटाळा झाला असून याची चौकशी झाली पाहिजे.” असे ते म्हणाले.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित- वंचित आघाडी

भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित- वंचित आघाडी

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group