‘आई कसं वाटतंय मुलाबद्दल.. शिव ठाकरेच्या आईच्या उत्तराने सलमान खान गहिवरला

 

हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालत आहे. त्याने आपल्या दमदार खेळाने इतर स्पर्धकांना मागे टाकलंय. इतकंच नाही तर शिवचा खेळ पाहून मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकही त्याच्या पाठीशी उभे आहेत. शिव ठाकरेने भारतभर हवा केली आहे. हिंदी प्रेक्षकांनाही त्याने भुरळ घातलीये. ‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आता त्याने आपलं लक्ष ‘बिग बॉस १६ वर केंद्रित केलं आहे.

ही ट्रॉफी मिळवण्यासाठी तो प्रचंड मेहनत करताना दिसतोय. आता शिवची आई या आठवड्यात बिग बॉसच्या घरात येणार आहे. तेव्हा सलमानने शिवच्या आईसोबत चक्क मराठीत गप्पा मारल्या. बिग बॉस १६ च्या घरात या आठवड्यात फॅमिली वीक असणार आहे. या दरम्यान विशेष करून स्पर्धकांची आई घरात त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी येणार आहे. यामध्ये शिव ठाकरेंची आई देखील आली. त्याचा एक व्हिडीओ शिवने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान शिवच्या आईसोबत मराठीत गप्पा मारताना दिसतोय.

सलमान शिवच्या आईला विचारतो, ‘आई कसं वाटतंय तुम्हाला तुमचा मुलगा फार छान खेळतोय’ त्यावर शिवची आई म्हणते कि, ‘फार छान वाटतंय शिव माझं नाव रोशन करत आहे. घरात सगळ्यांसोबत राहून सगळ्यांचं मन जिंकत आहे.’ त्यावर सलमान खान शिवचं कौतुक करत म्हणतो, ‘तो सगळ्यांमधला मास्टरमाइंड आहे. तो खूप छान खेळतो.’ हे ऐकून शिवची आई चांगलीच खुश होते.

Team Global News Marathi: