…तर स्वाभिमानाचा ‘एक्झिट’ कधीही बरा!; पंकजा मुंडे यंदा स्पष्टच बोलल्या

 

मागच्या काही दिवसांपासून मुंडे भगिनींना भाजपच्या वरीष्ठ नेत्याकडून डावलण्यात येत आहे याच खडखड भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवली आहे. अशातच आता त्यांनी केला कार्यक्रमात यावर भाष्य केले आहे.मला संधी का मिळत नाही याचं उत्तर संधी देणाऱ्यांनी का दिली अन् न देणाऱ्यांनी का दिली नाही तेच देऊ शकतील. मी त्याचे उत्तर देऊ शकत नाही. जर ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले.

त्या समाजासाठी समर्पित करण्याची मला मुभा नसेल तर तडजोडीचं राजकारण करणं मला शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक्झिट असतो तसा स्वाभिमानाचा एक्झिट कधीही बरा असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. नाशिक येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, विना स्वाभिमानाची तळी आपल्या ताटात वाढून घेण्यापेक्षा मला राजकारणातून बाहेर पडण्याची भीती कधीही वाटत नाही. कारण माझ्यासाठी हे स्पष्ट आहे. मी ज्या उंचीवर आहे तेथपर्यंत येणे सर्वांनाच जमते असं नाही. आज माझ्या एका ट्विटवर लाखो लोक जमतात. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो कायम राहावा असे राजकारण मला करता आले पाहिजे अन्यथा नको असं सांगत पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे.

राजकारणात तुम्ही स्पष्ट आणि ठाम असाल तर तुमचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात मी राहीले आहे. त्यांचे राजकारण मी जवळून पाहिले आहे. ते कधीही कुणासमोर झुकले नाही. तोच वारसा मी पुढे चालवित आहे. माणसाच्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती कायम रहात नाही. चांगले आणि वाईट दिवस येत जात असतात. फक्त ते संयमाने पार करावे लागतात.

Team Global News Marathi: