आरोग्याची सुवर्णसंधी , एक तास स्वतः साठी ; वाचा सविस्तर-

दैनदीन जीवनात आजच्या या धावपळीच्या युगात सर्व जण जबरदस्त घाईत असतात. कामाच्या व्यापामुळे आणि वेळेच्या अभावामुळेबऱ्याच छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टीचा विसर पडत आहे.

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक चुकीच्या गोष्टीचा अगदी मी ही दोन वर्षापूर्वी जीवनात चुकीच्या जीवनशैलीत दिवस काढत होते. त्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मला अनेक शारीरिक त्रास सुरू झाले.त्यात कंबरदुखी हा त्रास मला जास्त प्रमाणात होता. त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मी विश्र्वाई हॉस्पिटल अंबाजोगाई . वैद्य, श्री, शशांक पाठक यांच्याकडे गेले.

त्यांनी माझी नाडी परीक्षा केली. परीक्षा झाल्यानंतर वैद्यांनी जे काही सांगितले ,ते एकूण मझ्या पायाखालची जमीन सरकली . वैद्य म्हणाले , बेटा तू जरी 36 वर्षाची असलीस तरी तुझ्या शरीरातील पोशिंचे वय 60 वर्ष वयाच्या वृध्ध स्त्रीच्या शरीरात ज्या हालचाली सुरू असतात तशा हालचाली पूर्णतः तुझ्या शरीरात सुरू आहेत. तुझ्या आयुष्यात अस काय काय झालं आहे की एव्हढ्या कमी वयात तुझ्या शरीराची इतकी जास्त झीज होण्याचे कारण सांगू शकतेस का?

माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. मी म्हणाले, सर मी एक शिक्षिका आहे . आणि बाळंतपणात मला हवी तेवढी तब्येतीची काळजी घेत आली नाही. धून भांडी करताना खूप जास्त प्रमाणात मला खूप त्रास होतो . कंबर एकदम जखडून जाते.

कणीक तिंबतना जमिनीवरून मला हात टेकले शिवाय उठता येत नव्हतं. आता आपल्याला उतार वय लागले आहे याची जाणीव पावलोपावली
सकाळी झोपेतून उठल्यांपासून रात्री झोपेपर्यंत निरंतर जाणीव होत होती. माझ्या शरीर आणि त्यातील ताकद खूप कमी झाली आहे.

अनेक काम करताना मला याचा प्रत्यय दररोज येत आहे. आणि मला याचे आश्चर्य पण वाटत आहे की यांना माझ्या सर्व त्रासाची कल्पना फक्त आणि फक्त नाडी परीक्षे मुळे कळली. आता माझा उपचार नक्कीच अचूक होणार हा आत्मविश्वास मला आला .

वैद्यांनी मला पंधरा दिवसांच्या
आयुर्वेदिक गोळ्या दिल्या . त्या कोमट पाण्यासोबत घ्यायला सांगितल्या. आणि समूळ उपचारासाठी चार बस्ती कोर्से त्यांनी सुचवला. पण वेळ नसल्यामुळे मला तो कोर्स करणे शक्य नव्हते. आणि त्या बस्ती नंतर जे पथ्य पाळायचे असतात ते पालन करणं माझ्याच्याने शक्य नव्हते . हे मी पूर्णतः जाणून होते . म्हणून मी बस्तीचा विचार मनावर घेतला नाही.

असेच पंधरा दिवस गेले. गोळ्या सुरू होत्या तोपर्यंत चांगलं वाटलं. पुन्हा परिस्थिती पहिल्यासारखी झालेली असायची. मी सतत दवाखाना करून खूप वैतागले होते. वर बसलेल्या परमेश्वराला माझी काळजी असावी बहुतेक. एका व्हॉट्स ॲप ग्रौपवर एक लिंक आली होती.

त्या लिंकची माहिती आमच्या मिस्टरणे मिळवली. आणि ते रोज पहाटे त्या लिंकवर जॉईन होत होते. दररोज व्यायाम करणे , आहाराचं मार्गदर्शन असे दररोज सुरू होते त्यांचे.

मी ही रोज त्यांचा व्यायाम बघायचे. मला पण जोडीने त्यांच्यासोबत वर्कआऊट करायचं होताच. मी तो मोह आवरु शकले नाही. मग काय रोज पहाटे उठून आमचा व्यायाम सुरू झाला. आहाराचे पूर्ण ज्ञान मला रोज भेटत होते. रोज मनात वाटायचे. आपण एवढे सुशिक्षित असूनही आपला काही उपयोग नाही. आपण खूपच अज्ञानी होतो. याची पूर्ण जाणीव होत होती.

ज्ञान असले तरी आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मुळे रोज काटेकोरपणे पालन करू शकत नाहीत . पण मला व्यायामामुळे खूप फायदे झाले. माझा सकाळचा वेळ खूप सकारात्मक वातावरणात जावू लागला. माझं सात किलो वजन कमी झाले. मला येणारा कंटाळा, थकवा कमी झाला. माझ्यातील गतिमानता, सकारात्मक दृष्टीकोन , आत्मविश्वास वाढला. त्वचेचा रंग बदलला, चेहऱ्यावरील चमक खूप चकाकत आहे. झोप शांत लागत आहे. टाचदुखी बंद झाली.पित्त विकार कमी झाला. केस गळणे थांबले. ते दाट झाले.

अंगावरील असणाऱ्या चरबीच्या गाठी विरघळला. कंबरदुखी गायब झाली. चेहऱ्यावरील डाग गेले. असे अनेक बारीक सारीक फायदे फक्त आणि फक्त सकस संतुलित आहार आणि व्यायाम यामुळे मला झाले.
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर मला संपर्क करा.

आरोग्य सल्लागार
सौ. जयश्री अर्जुन मुंडे
9552098477

ग्लोबल न्युज नेटवर्क: