१५ दिवसांत अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई करू; नारायण राणे यांच्या बंगल्यास नोटीस

 

 

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई पालिकेने तिसरी नोटीस दिली आहे. ही अंतिम नोटीस असून, त्यात १५ दिवसांत बेकायदा बांधकाम न हटविल्यास पालिका स्वतःहून कारवाई करेल, असे इशारा नोटिशीतुन दिला आहे.

 

मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यास मुंबई पालिकेने २०१३ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु, त्यानंतर या बंगल्याच्या मूळ आराखड्यात बदल केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेने त्याची दखल घेतली. या तक्रारी नंतर दोन वेळा मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती

 

आता या संदर्भात पालिकेने ४ मार्च रोजी नारायण राणे यांना नोटीस पाठवून त्यांच्या घरातील बेकायदा बांधकामांविषयी माहिती देताना त्याविषयी म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर, १० मार्च रोजी राणे यांच्या वकिलांनी बंगल्यातील सर्व बांधकाम अधिकृत असल्याचे म्हणणे मांडले होते. पालिकेने हा दावा फेटाळून लावताना शुक्रवारी अंतिम नोटीस धाडली आहे.

Team Global News Marathi: