हातातील घड्याळ दाखवत शेतकरी पुत्राला विजयी करण्याचे विनायक मेंटेचे आवाहन

टीम ग्लोबल न्युज: : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघ हा भाऊ बहिणी तील टोकाच्या राजकारणामुळे चर्चेत आहे.मागील आठवड्यात राष्ट्रवादी च्या आमदाराने भाजपचा प्रचार करण्याचे निश्चित केल्यानंतर आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचं पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केलं.
देशात आणि राज्यात भाजपसोबत आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी दोन खासदार जास्त निवडून आणू मात्र बीड जिल्ह्यात भाजपच्या नव्हे2तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं विनायक मेटेंनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसंग्रामची राज्यात भाजप बरोबर युती असेल पण बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली होती. परंतु अशी भूमिका चालणार नाही,युती करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात असली पाहिजे असा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला होता.मात्र तरीही विनायक मेटे मागे हटले नाहीत. शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज जाहीर मेळावा घेऊन, मेटेंनी बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून त्यांनी वदवून घेतले.

मेटे यांनी भाषणात मंत्री पंकजा मुंडेंवर कडाडून टीका करताना माझ्या मंत्री मंडळातील समावेशाला त्यांनी कसा विरोध केला हे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे चांगले आहेत. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी साथ देणार असल्याचंही मेटेंनी जाहीर केलं.मेटे याचं बीड विधानसभा २०१४ साली क्षीरसागर यांनी मेटेविरोधात अवघ्या ५ हजारांनी निसटता विजय मिळवला होता . त्यानंतर भाजपने मेटेंना विधानपरिषदेवर आमदारकी दिली तसेच शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद दिले. मात्र, स्थानिक राजकारणात पंकजा मुंडे यांनी मेटेंना कायमच दूर ठेवले होते. त्यामुळे मागील चार वर्षे या दोघांत छुपा सत्तासंघर्ष होता. मेटे यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार हे निकालानंतर समजणार आहे.

admin: