उस्मानाबाद लोकसभा लढाई पाटील निंबाळकर भावांची बार्शीत प्रतिष्ठा पणाला लागली सोपल-राऊताची

धिरज करळे / गणेश भोळे

बार्शी :- लोकसभा निवडणुकीसाठी मतदान आठ दिवसावर आले तरी बार्शी विधानसभा मतदारसंघात  म्हणावा तसा निवडणुकीचा माहोल तयार झाल्याचे दिसत नाही़  मतदारसंघात अद्यापी दोन्ही उमेदवारांचा अपवाद वगळता मोठ्या नेत्यांची सभा झालेली नाही़ प्रचाराची संपुर्ण धुरा ही स्थानिक नेते आजी-आमदार दिलीप सोपल व राजेंद्र राऊत हेच सांभाळत आहेत़ महायुती व आघाडीच्या वतीने कॉर्नर सभा व मतदारांच्या वैयक्तिक गाठीभोटीवरच भर दिला जात आहे़ 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभोसाठी गेल्या अनेक निवडणुकापासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे  निवडणुकीच्या पहिल्या टप्यात अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आली तरी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले नव्हते़ राष्ट्रवादीकडून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव ही चर्चेत होते़ मात्र शिवसेनेने उस्मानाबादचे माजी आ़ ओमराजें निंबाळकर यांना मैदानात उतरवल्यामुळे  राष्ट्रवादीनेही उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवले़ यावर्षी निवडणुकीत  नेत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे ,मात्र कार्यकर्ते कांहीसे शांतच वाटत आहेत़ उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आ़ राणा पाटील यांच उपस्थितीत संवाद मेळावा  व शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ तर भाजपाने विजय संकल्प मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला़ या मेळाव्यालाही ओमराजे हजर होते़ तालुक्याच्या राजकारणात पक्षांपेक्षा आ़ दिलीप सोपल व माजी आ़ राजेंद्र राऊत या दोन नेत्यांचा प्रभाव आहे़ त्यांच्या जोडीला राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, बारबोले बंधू  हे भाजपाकडे आहेत़  दुसऱ्या टप्प्यात दोन्ही नेत्यांनी तालुक्यातील गावांचे दौरे काढत कॉर्नर सभा, मतदार व कार्यकर्त्यांच्या गाठीभोटीवर भर दिला आहे़ उमेदवाराला न बोलावता या दोन्ही नेत्यांनी संपुर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे़ भाजपाकडून बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत हे ग्रामीण भागात तर विजय राऊत हे शहरात  स्वतंत्र बैठका घेत आहेत़ भाजपाचे राजेंद्र मिरगणे हे ही हळूहळू प्रचारात सक्रिय झालेले दिसत आहेत तर सेनेच्या भाऊसाहेब आंधळकर यांनी एक सभा घेतली आहे़ आ़ सोपल यांच्या जोडीला नातू आर्यन सोपल ही भाषणे करीत आहे़

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभोसाठी गेल्या अनेक निवडणुकापासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे  निवडणुकीच्या पहिल्या टप्यात अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आली तरी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले नव्हते़ राष्ट्रवादीकडून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव ही चर्चेत होते़ मात्र शिवसेनेने उस्मानाबादचे माजी आ़ ओमराजें निंबाळकर यांना मैदानात उतरवल्यामुळे  राष्ट्रवादीनेही उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवले़ यावर्षी निवडणुकीत  नेत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे ,मात्र कार्यकर्ते कांहीसे शांतच वाटत आहेत़

उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आ़ राणा पाटील यांच उपस्थितीत संवाद मेळावा  व शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ तर भाजपाने विजय संकल्प मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला़ या मेळाव्यालाही ओमराजे हजर होते़ तालुक्याच्या राजकारणात पक्षांपेक्षा आ़ दिलीप सोपल व माजी आ़ राजेंद्र राऊत या दोन नेत्यांचा प्रभाव आहे़ त्यांच्या जोडीला राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, बारबोले बंधू  हे भाजपाकडे आहेत़  दुसऱ्या टप्प्यात दोन्ही नेत्यांनी तालुक्यातील गावांचे दौरे काढत कॉर्नर सभा, मतदार व कार्यकर्त्यांच्या गाठीभोटीवर भर दिला आहे़ उमेदवाराला न बोलावता या दोन्ही नेत्यांनी संपुर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे़ भाजपाकडून बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत हे ग्रामीण भागात तर विजय राऊत हे शहरात  स्वतंत्र बैठका घेत आहेत़ भाजपाचे राजेंद्र मिरगणे हे ही हळूहळू प्रचारात सक्रिय झालेले दिसत आहेत तर सेनेच्या भाऊसाहेब आंधळकर यांनी एक सभा घेतली आहे़ आ़ सोपल यांच्या जोडीला नातू आर्यन सोपल ही भाषणे करीत आहे़

महायुती: हे आहेत प्लस पाँईट

भाजपा सेनेची झाली युती, देशपातळीवर मोंदीनी केलेले काम व पाकिस्तानमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक,बार्शी तालुक्यात विविध विकासकामांसाठी मिळालेला भरीव निधी,नुकताच शेतकऱ्यांना  मिळालेला पिक विमा, कर्जमाफी,पेन्शन योजना, पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमल बजावणी, बाजार समिती, नगरपालिका व जि़प़ पंस़ वर असलेले वर्चस्व़

हे आहेत विक पाँईट:

 कांद्यासह शेतमालाचे पडलेले दर,  मागील पाच वर्षात विद्यमान खासदार गायकवाड यांनी बार्शीकडे केलेले दुर्लक्ष, ओमराजेंचा तालुक्यात असलेला अल्प संपर्क,स्थानिक शिवसेना भाजपा नेतृत्वात नसलेली एकी

महाआघाडी – प्लस पाँईट

राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा तालुक्याशी असलेला घनिष्ट संबध,आ़ दिलीप सोपल यांचा मोठा राजकीय अनुभव, शहरात मोठ्या प्रमाणात असलेला मुस्लिम  व अल्पसंख्यांक समाज,

 हे आहेत विक पाँईट

हातातून गेलेली बाजार समितीसह विविध सत्ताकेंद्रे व कार्यकर्त्यात आलेली मरगळ, जिल्हा बॅँकेवर प्रशासक आल्याने धास्तावलेले कार्यकर्ते , स्थानिक काँग्रेसशी असलेले मतभोद

मागच्या निवडणुकीत

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप सोपल (९७६५५) यांनी शिवसेनेचे तत्कालिन उमेदवार राजेंद्र राऊत (९२५४४ ) यांचा ५१११ मताने पराभव केला होता़

मागच्या तीन लोकसभांमधील निकाल

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभोतून सेनेच्या कल्पना नरहिरे यांना ५११२४ तर राष्ट्रवादीच्या लक्ष्मण ढोबळे यांना ५३४९८ मते मिळाली होती़

२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ़ पद्मसिंह पाटील यांना शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांच्यापेक्षा पंधरा हजार मते जास्त मिळून बार्शीच्या मताधिक्याच्या जोरावर ते विजयी झाले होते़

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेला १०४९८७ , राष्ट्रवादी काँग्रेसला ४९८९६ तर इतर उमेदवारांला १९९०५ मते मिळाली होती़ म्हणजे सेनेला ५५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते़

तालुक्यात एवढे आहे मतदान

सध्या तालुक्यात २ लाख ९८ हजार ६०२ मतदार आहेत यात १४२५६७ महिला तर १५६०१९ पुरुष मतदार आहेत़ तृतीयपंथी मतदान १६ आहे़ 

यांच्या होणार सभा:

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या सभोचे नियोजन आहे़ आ़ सोपल हे स्वत:राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत़ तर महायुतीकडून स्वत: राजेंद्र राऊत हेच प्रचाराची खिंड लढवणार आहेत़

admin: