सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य : आ.राजेंद्र राऊत; बाजार समितीत स्नेहमेळावा

सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य : आ.राजेंद्र राऊत
बाजार समितीत स्नेहमेळावा
बार्शी : व्यापार्‍याना विविध उद्योग निर्मितीसाठी शासनाकडून अनुदान व संरक्षण मिळण्याची गरज असून बाजार समितीमधील व्यापार्‍यानी सोयाबीन प्रक्रियासारखे उद्योग उभारणीत पुढाकार घेतल्यास त्याना बाजार समिती व आमदार म्हणून सर्वतोपरी सहकार्य राहिल, अशी ग्वाही आ. राजेंद्र राऊत यानी दिली.


 उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी, व्यापारी, कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, उपसभापती झुंबर जाधव, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, माजी नगराध्यक्ष विश्‍वास बारबोले, रमेश पाटील, संचालक रावसाहेब मनगिरे, राजेंद्र गायकवाड,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, ज्येष्ठ व्यापारी बाबासाहेब कथले, दिलीप गांधी, मल्लिनाथ गाढवे, सचिन मडके, कादर तांबोळी, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते,वासुदेव ढगे, किशोरभाई शहा, अतुल सोनिग्रा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


प्रदीप बागमार यानी प्रास्ताविकात शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार यांच्यामध्ये समन्वयाची गरज असून या  मेळाव्यातून सर्वांच्या अडचणींवर विचारविनिमय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.आ. राऊत म्हणाले, बाजार समितीमधील कोणत्याही घटकाने मला मनमोकळेपणाने अडचणी सांगाव्यात, व्यापार्‍यानी मोकळेपणाने व्यापार करावा. कोणत्याही समस्येबाबत मला थेट भेटावे, मला सार्वजनिक विकासकामे आणि व्याक्तिगत अडचणी सांगण्यासाठी कोणाही मध्यस्थाची अजिबात गरज नाही. सत्कार व हारतुर्‍रामध्ये फार वेळ घालविणार नाही. तालुक्यातील सर्व गावांना भेटी देणार आहे. उपसा सिंचन रोजना, साठवण तलावांची निर्मिती, मृत नद्यांचे पुनरुज्जीवन, वीज उपकेंद्राची उभारणी, जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग वाढविणे या कामांना प्राधान्य देणार असून सहा महिन्यात तावडी व दीड वर्षात ढाळेपिंपळगाव प्रकल्पात उजनीचे पाणी आणणारच, तालुका पाणीदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.


यावेळी दिलीप गांधी, कांतीलाल मर्दा, माजी नगराध्यक्ष बारबोले, नगराध्यक्ष तांबोळी यानीही समयोचित मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सचिव तुकाराम जगदाळे, शंतनु पवार, संदिप मिरगणे,गोकुळदास मिरगणें यानी परिश्रम घेतले. यावेळी मर्चंट असोच्या वतीने आमदार पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: