बार्शीत जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने शिवदीप महोत्सव उत्साहात साजरा

बार्शीत जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने शिवदीप महोत्सव उत्साहात साजरा
बार्शी:
येथील जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने येथील जवाहर हॉस्पिटल समोरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून शिवदीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमासाठी बार्शी तालुक्यातील महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भारतीय महसुल खात्यामध्ये सेवा बजावत असलेले महादेव धारूरकर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जालना जिल्हा परिषदेतील मनरेगाचे गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, राज्य सहाय्यक कर आयुक्त किशोर मिरगणे, वृक्षमित्र मधुकर डोईफोडे, स्मार्ट अॅकॅडमीचे सचिन वायकुळे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधिर राऊत, गणेश गोडसे, पाणी पुरवठा सभापती संतोष बारंगुळे, शिरिष जाधव, दिपक तलवाड, राजश्री डमरे-तलवाड, संजय बारबोले, उमेश काळे, गणेश घोलप, अजय पाटील आदी मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते. 

यावेळी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मधुकर डोईफोडे आदी मान्यवरांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले. जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या चरणी शेकडो दीप व मशाली प्रज्वलीत करून शिवदीप महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवरायांच्या मूर्ती परिसर फुलांच्या सजावटीने दिव्यांनी मशालीच्या प्रकाशात उजळून निघाला होता. सुत्रसंचालन संकेत वाणी यांनी केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: