शरद पवार दुष्काळी पाहणी करण्यासाठी सांगोला दौऱ्यावर,शेतकऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून

सांगोला; लोकसभा निवडणुकीची धावपळ कुठे थांबत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे थेट दुष्काळी दौऱ्यावर आले आहेत.
शरद पवार यांनी मंगळवारी सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.  यावेळी एका शेतकऱ्याने तक्रार केली, फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश आहे, सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, अशी विनंती शेतकऱ्याने केली.

रोज पंधरा किलो चारा मिळतो, मात्र जनावरांना अधिक चारा मिळावा. दोन हजार लिटर दूध संकलन होतं. त्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे, अशी स्थिती गावकऱ्यांनी पवारांना सांगितली.

admin: