रोहित पवार यांनी ही केले वॉटर कप स्पर्धेच्या कामावर श्रमदान

जामखेड: राज्यात सर्वत्र पाणी फाउंडेशन चे काम जोरात सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यात महाश्रमदान कामात सहभाग नोंदवत श्रमदान केले.
याबाबतीत माहिती देण्यासाठी रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,माझे आजोबा कै. अप्पासाहेब पवार हे आपल्या “पाणी – २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी” या पुस्तकात लिहतात की तिसरे महायुद्ध हे पाण्यामुळे होवू शकते. त्यांनी फक्त विचारच मांडले नाहीत तर पाण्याची बचत करावी, नैसर्गिक जलस्त्रोतात वाढ व्हावी म्हणून अनेक कृतीशील प्रयोग अंमलात आणले. महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने भारताच्या भूमीला ठिबक सिंचनची ओळख करुन देणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी ते होते. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मार्फत शेती, शेतकरी व कुटूंबाचा विकास साध्य करत असताना “पाणी” या विषयावर सर्वच पातळ्यांवर कृतीशील कामे करण्यात आली.

वडिल राजेंद्र पवार आणि आई सुनंदा पवार यांच्या बरोबरीनेच संपुर्ण अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट पाणी या विषयावर सक्रीय योगदान देत आली आहे. नुकतेच कर्जत जामखेड मधील पाण्याची परिस्थिती पाहून बारामती अॅग्रो मार्फत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. पुढे संस्थेमार्फत, कंपनीमार्फत कायमस्वरुपी उपाययोजन केल्याच जातील.

हे सर्व सांगण्याच कारण म्हणजे, दिनांक ५ मे रोजी पाणी फाऊंडेशन मार्फत आयोजित करण्यात येत असणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट नेहमीच पाण्यासाठी महत्वपुर्ण काम करणाऱ्या व्यक्तींच्या, संस्थांच्या पाठीमागेच नव्हे तर हातात हात खालून सोबत काम करत आली आहे. मला विश्वास आहे या महाश्रमदानामध्ये आपण देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवाल.
चला एकत्र परिवर्तन घडवुया, दुष्काळाची दोन हात करुया.
अवश्य या भेटूया, श्रमदानात सहभागी होवुया. असे आवाहन पवार यांनी केले आहे.

admin: