बार्शी तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी ग्रामविकास अधिकारी संतोष माने

बार्शी : संचालक व सर्व सदस्यांनी टाकलेला  विश्वास सार्थ करून योग्य त्या पद्धतीने कामकाज करत सभासदांच्या गरजा सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन पांगरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संतोष माने यांनी केले.बार्शी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर बार्शी येथे पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी माने बोलत होते.   बार्शी येथील पंचायत समिती मधील संस्थेच्या कार्यालयात ग्रामविकास अधिकारी संतोष माने यांची चेअरमनपदी, शाखा अभियंता चिमाजी जाधवर यांची व्हाइस चेअरमनपदी निवड करण्यात आली. तसेच तज्ञ संचालक पदी शाखा अभियंता  एम.जे नाईकवाडी यांची एकमताने निवड करण्यात आली.   बिनविरोध निवडीसाठी ज्येष्ठ संचालक अनिल बारसकर, अंकुश काटे,तात्या साठे,भरत आवटे यांनी प्रयत्न केले.यावेळी पतसंस्थेचे संचालक पद्मराज जाधवर, शिराज शेख,मधुकर आगलावे,राजकुमार रंगदाळ,पांडुरंग कागदे,बाळासाहेब झालटे,शोभा शिंदे,वंदना भालशंकर,मंजुषा उगलमुगले,सचिव धर्मा जाधव आदी उपस्थित होते.   मावळते चेअरमन संतोष शेळके यांनी संस्थेचा जिल्ह्यात नावलौकिक असुन बॅकेने पतसंस्थेस पुरस्काराने गौरवले असल्याचे सांगितले. आर्थिक वर्ष संपताच चारच दिवसात व्याज वाटप सभासदांच्या बॅक खात्यामध्ये जमा करणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था  आहे. निवडीनंतर पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर फटाके फोडुण व पेढे वाटुन  आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामसेवक,पंचायत समिती कर्मचारी  आदी उपस्थित होते. 

admin: