भगवंत महोत्सवात ठसकेबाज लावण्यानी बार्शीकर घायाळ,सदाबहार गीतांची ही मिळाली मेजवानी

गणेश भोळे/प्रशांत खराडे

बार्शी : बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भगवंत महोत्सवाचा चौथा दिवस दादा साळुंखे यांच्या भाग्यश्री पॉडक्शन निर्मित स्टार्स ऑफ मेलडी सोलापूर प्रस्तुत ‘संगीत रजनी ‘ या कार्यक्रमाने गाजविला. भक्तिगीते ,सदाबहार हिंदी मराठी नवी जुनी गाणी, गवळण,मराठमोळ्या ठसकेबाज  लावण्या आणि आयटम सॉंग च्या जलव्यावर  उपस्थित बार्शीकर रसिकांना घायाळ केले.

प्रारंभी शहरातील व्यापारी आणि ज्येष्ठ उद्योजकांच्या  हस्ते ग्रामदैवत भगवंत प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,उपमुख्याधिकारी शिवाजी कांबळे,महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, सचिव संतोष सुर्यवंशी, रावसाहेब मनगिरे व व्यापारी  सर्वश्री  नंदकिशोर सोमाणी, विलास गुगळे, चंद्रकांत सोनीग्रा , पोपट परमार, दिनेश छेडा दिलीप गांधी , बाबासाहेब कथले रमेश पुनमिया, माणिक नवगिरे, धनुभाई शहा , दिलीप खटोड, सिकंदर शेख, सुभाष साखरे, किरण ललवाणी, राजाभाऊ बाबर, नागेश रुद्रवार ,संतोष शहा, भारत कोटेचा, इकबाल पटेल, जयेश कोठारी मल्लीनाथ गाढवे,  आमित कटारिया ,संजय खांडवीकर ,निलेश सरवदे, सुनिल पाटील , कांतीलाल मर्दा, अविनाश तोष्णीवाल ,अक्षय बंडेवार,पोपट पुनमिया,उज्वल सोमाणी,सचिन मडके आदी उपस्थित होते.यावेळी सुनील पाटील व बाबासाहेब कथले यांनी आपल्या भाषणात भगवंत महोत्सव आयोजकांचे कौतुक केले.


या गीतांचे झाले सादरीकरण

यावेळी दर्शन देरे देरे भगवंता,आज कल याद कुछ और  रहेता नही…आज कल याद रहेता नही आपके आनें के बाद , अधिर मनं झालं , सैराट याड लागलं ग याड लागलं ग, जीव रंगला असा, मला वेड लागले प्रेमाचे,जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारी,या रावजी बसा भावजी,वयात आलं जवान झालं पारवळ घुमतय कस…बघतोय वाट माझी रिक्षावाला ,फडफडतय बाई फडफडतय हिच्या ज्वानीच पाखरू फडफडतय..आदी लावण्या व गीते सादर केली.

राजकुमार जाधव यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.सूत्रसंचालन अजित कुंकुलोळ आणि श्रीधर कांबळे यांनी केले.

आज बुधवारचे कार्यक्रम 

बुधवार दि १५ रोजी सायंकाळी ६ वाजता भगवंत मंदिरात जयवंत बोधले महाराज यांचे किर्तन तर रात्री आठ वाजता भगवंत मैदान येथे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे. 

गुरुवारी भगवंत प्रकटोत्सव 

भगवंत प्रकटोत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे साडेचार  वाजता भगवंत मंदिरात जयवंत बोधले महाराज यांचे किर्तन होणार आहे.

या कलाकारांचा केला सत्कार

भाग्यश्री मुंबईकर ,करिष्मा कोल्हापूरकर, पल्लवी जाधव ,गायिका सोनी सोलापूरकर,संगीतकार जब्बार आणि धनंजय,गायक विनायक ,ढोलकी पटु महेश कांबळे या कलाकारांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संयोजकांचे कौतुक

दादा साळुंखे: जिल्ह्यात असा मोठा महोत्सव कोण करत नाही असे सांगत उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

admin: