बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्सादकांना दिलासा 80 कोटी पीक विमा मंजूर

बार्शी:गणेश भोळे

 यावर्षी तालुक्यात अत्यल्प पडलेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून खरीप व रब्बी हंगामातील पिकांमध्ये  उत्पन्नात घट आल्याने शासनाने निश्चित केलेल्या उंबरठा उत्पन्नापेक्षा पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्नात ७५ टक्केपेक्षा जास्त घट दिसून आली होती त्यानूसार उशिरा का होईना ओरिएंटल विमा कपंनीने खरीप हंगामातील सोयाबीनचा पिक विमा मंजूर केला असून

शेतकऱ्यांना हेक्टरी २१९२५ रुपये मंजूर झाल्याने तालुक्यातील विमा भरलेल्या ४४०६४ शेतकऱ्यांना ७९ कोटी ९३ लाख ८५ हजार ५०० रुपये विमा
मंजूर झाला असून आज गुरुवार दि ९ मे पासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत़

बार्शी तालुक्यामध्ये सन 2018-19 खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तालुक्यातील उडीद, मूग व सोयाबीन या

तिन्ही पिकांचे पीक कापणी प्रयोग कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आले असून यामध्ये उडीदाचे हेक्टरी सरासरी 262 किलो, मूग हेक्टरी 136 किलो तर सोयाबीनचे हेक्टरी 318 किलो उत्पन्न प्रत्यक्षात दिसून आले. या पिकाचे शासनाचे उंबरठा उत्पन्न यापेक्षा

कितीतरी अधिक म्हणजे उडीद 526 किलो, मूग 403 किलो व सोयाबीन 1,387 किलो एवढे आहे. म्हणजे सुमारे 70 ते 75 टक्के घट असल्याचे या पिकाच्या प्रयोगातून दिसून आले होते. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी व त्यांच्या टिमने काटेखोरपणे पिक कापणी प्रयोग करुन घेतले होते़

बार्शी तालुक्यातील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचा पीक विमा भरतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्या पट्टीत विमा मिळत नाही. खरीप हंगामामध्ये तालुक्यातील 1 लाख 5 हजार 435 शेतकºयांनी 68 हजार 205 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा भरला आहे. यामध्ये 31 हजार 995 शेतकऱ्यांनी

17 हजार 21 हेक्टर क्षेत्र उडीदाचा 18 हजार 192 शेतकऱ्यांनी 5 हजार 746 हेक्टर मुगाचा तर ४४ हजार ६४ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा भरलेला आहे यातील मुग व उडीचा विमा मागील महिन्यातच मंजूर झाला होता व तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला देखील आहे़

ही आहे सोयाबीनची मंडळवाईज आकडेवारी अनुक्रमे विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या ,क्षेत्र हेक्टरमध्ये आणि मिळणारी रक्कम

बार्शी -२००६ हे क्षेत्र १३९० – ३०४७५७५०
आगळगाव ५२०२- क्षेत्र हे ३६९५- ८१०१२८७५
गौडगाव ४६१६ -क्षेत्र हे ४९११- १०७६७३६७५
खांडवी -३५९०-२०४६- ६७५३१८९५ ,
नारी -७१७६-६९५७ -२२९५७०६०१ .
पानगाव -३६२४-२५३२-८३५४५६५५ . पांगरी-४३३७-३१०२-१२५४६२१०७ .
सुर्डी -३८९६- २५४५- ८३९७६२५५ .
उपळे( दु) -५६९६ -५१०१-१६८३३८८०५ . वैराग-३९२१-३४८१-११४८७४४७४
असे एकुण१०मंडळातुन ४४०६४ शेतकऱ्याना ३६४६० हेक्टर क्षेत्रासाठी ७९९३५१०३७ इतका विमा मंजुर झाला आहे .बार्शी तालुक्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर झाले असून गुरुवार पासून शेतकºयांनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे ओरीएंटल विमा कंपनीचे वरिष्ठ विभागीय मॅनेजर बसवराज करपे यांनी दै तरूणभारतशी बोलताना सांगीतले़ बार्शी तालुक्यातील शेतकºयांनी सोयाबीनचा २ कोटी १६ लाख २४ हजार

६९९ रुपये हप्ता भरला होता़ त्यात राज्य व केंद्र शासनाने प्रत्येकी १० कोटी ९७ लाख २८ हजार ३३८ असा एकूण २४ कोटी ३५ लाख १९ हजार ९१६ रुपये हप्ता विमा कंपनीकडे भरला होता त्यापोटी हा विमा मंजूर केला आहे .

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

बार्शी तालुक्यातील खरीप असो की रब्बी यंदा पाऊस कमी पडल्यामुळे पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली होती़ शेतकऱ्यांचे ७५ टक्यापेक्षा जास्त नूकसान झाले होते त्यामुळे पिक कापणी अहवाल व्यवस्थीत करावेत़ यासाठी माजी आ़ राजेंद्र राऊत यांचा नेहमी कृषी विभागाकडे पाठपुरावा होता़ तसेच विमा मिळावा म्हणून राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही पत्राद्वारे पाठपुरावा केला होता़ त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा मंजूर झाल्याचे राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांचे आभार मानले .

admin: