पवार कुटुंबाच्या दूरदृष्टीमुळेच पिंपरी चिंचवड ला रोजगार उपलब्ध-विजयसिंह पंडित

ग्लोबल न्यूज नेटवर्क: अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातून आपण कामकाजाच्या शोधामध्ये येथे आलात व स्थायीक झालात. ९० च्या दशकात या भागात जंगल आणि काळ्या मातीशिवाय काहीही नव्हते. परंतु शरद पवार , अजित दादा यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या माध्यमातून या भागाला महानगराचे स्वरूप आणले. पवार कुटुंबियांच्या दूरदृष्टीमुळेच आपल्याला रोजगार उपलब्ध झालेला आहे. याची जाणीव ठेवत मावळ च्या विकासासाठी एक तरुण नव्या उमेदीने आपल्याला साद घालत आहे याला सकारात्मक प्रतिसाद देत या उमद्या तरुणाला येणाऱ्या २९ एप्रिलला आपले मतदान रुपी आशिर्वाद देत विजयी करावे असे आवाहन बीड जिल्ह्याचे युवा नेते विजयसिंह पंडित यांनी केले.

मावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षाचे (संयुक्त पुरोगामी आघाडीचे) उमेदवार श्री.पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ मुळ बीड जिल्ह्यातील परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात स्थायीक झालेल्या मतदारांशी गेल्या ३ दिवसांपासून पंडित हे संवाद साधत आहेत त्यावेळी ते बोलत होते. पंडित यांनी तीन दिवस या मतदारसंघात थांबून सर्व बिडकर पुणेकराशी संवाद साधला.

admin: