उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील खर्चात सेनेचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर

उस्मानाबाद: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झालेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्याची तृतीय तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च संनियंत्रण) पी.सुधाकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक खर्च करण्यात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असून त्यांनी 35 लाख 63 हजार तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील हे 33 लाख35 खर्चासह द्वितीय क्रमांकावर आहेत.

40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष व पात्र उमेदवार यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाचे लेखे जिल्हा खर्च नियंत्रण कक्षात सादर करण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.

उमेदवारनिहाय निवडणूक खर्चाची माहिती पुढीलप्रमाणे-
उमेदवाराचे नाव- ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर (पक्ष-शिवसेना) रु.35 लाख 63 हजार 241, राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) रु. 33 लाख 25 हजार 633, डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन (बहुजन समाज पार्टी) रु.66 हजार 940, अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी) रु.आठ लाख 66 हजार 435, अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल) रु. 93 हजार 708, दीपक महादेव ताटे (भा.प.सेना पार्टी) रु.एक लाख 34 हजार 668, विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जय हिंद सेना) रु.1लाख 2 हजार 541, आर्यनराजे किसनराव शिंदे (अपक्ष) रु.अठरा हजार 380, नेताजी नागनाथराव गोरे (अपक्ष) रु.1 लाख 27 हजार 855, जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 60 हजार 235, तुकाराम दासराव गंगावणे (अपक्ष) रु.37 हजार 400, डॉ.श्री.वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 86 हजार 10, शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष) रु.64 हजार 511, सय्यद सुलतान लाडखाँ (अपक्ष) रु.29 हजार 257.
या तपासणीसाठी सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या तपासणी बैठकीस खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर श्री. शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफिसर श्री किरण घोटकर, संपर्क अधिकारी श्री. सचिन कवठे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

admin: