जाणून घ्या तृणधान्य खाण्याचे फायदे

🏋‍♂ तृणधान्यांचे आहारातील महत्त्व

👉🏻 बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे स्थूल व्यक्तींना ‘होलग्रेन’ म्हणजेच तृणधान्ये खाण्याचा सल्ला दिला जातो

🙋‍♂ तृणधान्य म्हणजे काय?

👉🏻 प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप हे तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. उदाहरणार्थ, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी इत्यादी. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो.

💁🏻‍♂ तृणधान्यातील घटकांचे फायदे

👉🏻 कोंडा म्हणजे तृणधान्याच्या सर्वात बाहेरील आवरण असते. यामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक (फायबर) मुबलक प्रमाणात असते. यातील दुसरा घटक असलेल्या अंकुरापासून दुसरे पीक उगवू शकते.

👉🏻 या अंकुरामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश असतो. एन्डोस्पर्म हा तृणधान्याचा मुख्य खाद्यपुरवठा करणारा घटक आणि तृणधान्याचा सर्वाधिक भाग याने व्यापलेला असतो. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात. यामधील स्टार्च हा शरीराला ऊर्जा पुरवतो.

👉🏻 तृणधान्यांमध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड मोठय़ा आतडय़ातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीस मदत करते. या जिवाणूंमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते, पोषणाचे शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

👉🏻 तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो आणि आयुर्मान वाढते . यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश असणे गरजेचे आहे

admin: