कृष्ण आणि महाभारत रणनीती भाग २; श्री कृष्ण का गेले विदुराच्या झोपडीत

कृष्ण आणि महाभारत रणनीती भाग २; श्री कृष्ण का गेले विदुराच्या झोपडीत

कौरव सैन्य आता अजस्त्र म्हणावे इतके मोठे झाले होते.अनेक महारथी फक्त कौरव सैन्यात मोठे मोठे योद्धे आहेत म्हणून सहभागी झाले होते.त्यात कृष्णासारख्या शस्त्र हिन आणि युद्ध न लढणाऱ्या माणसाला निवडून पांडवांनी चूकच केली आहे अस सगळ्यांना वाटत होत.यात एकच मनुष्य असा होता ज्याला विश्वास होता की अर्जुनाने जे केलं योग्य केलं.तो म्हणजे युधिष्ठिर.

कौरव सैन्यात भीष्म, कर्ण यासारखे योद्धे होते.अश्वत्थामा च्या हट्टापायी आलेले द्रोणाचार्य होते.फसवून आणलेले कृपाचार्य होते आणि महाशक्ती असलेली वीरांनी भरलेली नारायणी सेना होती.

पण या सगळ्यांमध्ये एक खूप महत्त्वाची व्यक्ती होती जी कोणालाच हस्तीनापुरात तितकी महत्वाची कोणालाच वाटली नाही.ती व्यक्ती शस्त्र आणि शास्त्र जाणत होती,अतिशय चांगल्या मनाची होती,कृष्ण भक्त होती पण तरी सुद्धा तिच्या जन्मी फक्त आणि फक्त दास्य आले होते.
ती व्यक्ती म्हणजे धृतराष्ट्र आणि पंडू यांचे बंधू पण तरी सुद्धा दासिपुत्र म्हणून हिणवले गेलेले महामंत्री

“विदुर”

पण शेवटी भगवान असलेल्या कृष्णाला त्यांची आठवण झाली नसेल तर नवलच.प्रत्येक युद्ध सुरू व्हायच्या आधी ते होऊ नये म्हणून अटोकाट प्रयत्न केले जातात हा क्षत्रिय धर्म आहे हे युधिष्ठिर जाणून होता.त्याने सर्वांना सांगितले की कौरवांकडे आपला एक दुत पाठवा जो त्यांच्याकडे शांतीची मागणी करेल….

युधिष्ठिर योग्यच बोलत होता पण तिथे जाणार कोण?तिथे जाणारी व्यक्ती विद्वान हवी,संयमी हवी आणि शांत हवी.असे गुण असलेली एकमेव व्यक्ती पांडव सैन्यात होती ती म्हणजे श्री कृष्ण.कृष्णाने ही गोष्ट मान्य केली…

कृष्ण हस्तीनापुर नगरी जवळ आला संध्याकाळ झाली होती.राहायचे कुठे हा प्रश्न होता….. खायला राहायला मखमली गादी असलेली जागा दुर्योधन नक्की देऊ शकला असता पण कृष्णाला ह्याचा हव्यास कधीच नव्हता
तिथे कृष्णाला एक झोपडी दिसली.त्या झोपडीत एक म्हातारा वाटेल असा माणूस राहात होता.कृष्ण त्या झोपडी जवळ गेला
आत विदुर बसले होते.कृष्णाला पाहताच विदुरांना आनंद झाला.त्यांनी कृष्णाचे स्वागत केले पण….

गरीब मनुष्य किती करणार हो?
आपला देव आपल्या समोर आहे याची जाणीव त्यांना झाली होती.पण कृष्णाला खायला काय द्यायचे हे त्यांना समजत नव्हते. कृष्णाने विदुराची परीक्षा आरंभली होती.
“मला भूक लागली आहे काय खायला देता तातश्री?”
विदुर ओल्या डोळ्यांनी कृष्णाकडे बघत होते.खायला फक्त धान्याच्या कण्या शिल्लक होत्या.हृदय पिळवटून त्यांनी अखेर कृष्णाला ही गोष्ट सांगितली.

कृष्णाने आनंदाने त्या कण्या खाल्ल्या…..खाऊन तृप्तीची ढेकर दिली…..(आपल्या भक्तांसाठी कृष्णाने बोर,कण्या जे द्याल ते खाल्ल पण एक प्रश्न होताच….)
कृष्णाने आजच विदुरा कडे यायचं का ठरवलं होत?
यातच कृष्णाची पुढची रणनीती होती ती म्हणजे….

“संशय”

कृष्ण दुसऱ्या दिवशी तिथूनच दुर्योधनाच्या राज्यसभेत गेला ते ही विदूरा सोबत राज्यसभेत गेला. पुढे काय झाले ते पुढच्या भागात सांगणार आहेच…. पण या इतक्या छोट्या कृतीने महाभारतात काय फरक पडला असणार?

साध्या भाषेत सांगायचं तर कृष्णाने आधीच संशयी असलेल्या दुर्योधनाच्या मनात एक अजून बीज रोवल होत आणि त्याचा विषवृक्ष होणार होता दुसऱ्या दिवशी. दुर्योधनाला हळूहळू संशय येऊ लागला होता…त्याच्याच महामंत्र्याचा ज्याने अनेक राज्य कौरवांच्या बाजूने आणून दिली होती त्याचा…..

पण हेच विष विदुराला वाचवणार या महायुद्धाचा भाग होण्यापासून….

कस ते पुढच्या “कृष्ण शिष्टाई” भागात

क्रमशः
©Yash Oak

ग्लोबल न्युज नेटवर्क: