काही सोडूनच द्यायचं असेल तर निरार्थक अपेक्षा सोडून द्या..

काही सोडूनच द्यायचं असेल तर निरार्थक अपेक्षा सोडून द्या..

 

 

मिनल वरपे

आज तिने तिच्या नवऱ्याशी कायमच नात तोडण्याचा निर्णय घेतला आणि याच कारण काय तर तो तिला हवं तस वागत नव्हता आणि तिला हवं काय होत तर महागड्या साड्या, दागिने आणि चैनीच्या वस्तू यांची आवड पण नवऱ्याच बजेट तितकं नसल्याने तिला जस पाहिजे तस राहता येत नव्हतं..

हे एक अगदी साधं उदाहरण आहे.. यामधे तिच्या ज्या अपेक्षा आहेत त्यामधे काहीच तथ्य नाही.. कारण जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यांचा अट्टाहास करणे आणि त्या गोष्टी मिळण्याची अपेक्षा करणे हे कायम योग्य आहे.

पण ज्या अपेक्षा आपल्याला कायम त्रास देतात.. अशा अपेक्षा ज्यातून आपल्याला नाराजी मिळते अशा अपेक्षा आपण आपल्यापासून दूरच ठेवल्या तर आपल्याला जगण्यातला आनंद मिळेल.

मला हेच हवं आहे..मला तेच अपेक्षित असते.. विनाकारण आपल्या अपेक्षा इतरांवर लादणे असो नाहीतर विनाकारण निर्माण झालेल्या आपल्याच आपल्याकडे असणाऱ्या अपेक्षा असो… त्रास तर होणारच.

मिळते म्हणून मला अजून जास्त पाहिजे ही अपेक्षा .. तर इतरांकडे आहे पण गरज नसताना सुद्धा मला ते पाहिजेच ही अपेक्षा..यातून आपल्यातील समाधान मानण्याचा स्वभाव कधी आपल्यापासून दूर होतो कळतच नाही.

आणि मग अशा बिनकामाच्या अपेक्षा करत नको ते निर्णय आपण घेत असतो. कधी घर सोडण्याचं तर कधी नात तोडून आपल्या माणसांना कायमच सोडण्याचा निर्णय … आणि जर स्वतःला अपेक्षांचं ओझ जास्तच झालं तर जीव देण्यापर्यंत निर्णय घेण्यात आपल्याला काहीच वाटत नाही.

असे अनेक उदाहरण अनेक बातम्या आपण रोजच ऐकत असतो…आपल्याबाबतीतही असे अनेक अनुभव आपण सहज सांगू शकतो. परंतु त्या निरर्थक अपेक्षांचा आपल्याला त्रास होतोय, हे मात्र आपण मुळीच स्वीकारू शकत नाही.

किंबहुना जवळ बाळगलेल्या अपेक्षा निरर्थक आहेत, हेच आपल्याला समजलेलं नसतं. आयुष्य जगण्याचा तो एक भाग आहे, हे स्वीकारून चालत असतो. समोरच्यांकडून भरपूर अपेक्षा ठेवणं आणि त्या लादणं हा काही जगण्याचा भाग असू शकत नाही. यामुळे आपण विनाकारण इतरांनाही माफक त्रास देत असतो.

पुष्कळ विवाहित जोडपी लग्नाआधी आपल्या जोडीदाराकडून असंख्य अवास्तव अपेक्षा बाळगून असतात. ते त्या भावविश्वात इतके गुरफटून जातात कि ज्यावेळी वास्तवतेची जाणीव होते त्यावेळी मात्र भांबावून जातात. म्हणजे मी जी काही अपेक्षा केलेली होती मुळात तसलं काहीही होताना जेव्हा बघायला मिळत नाही, तेव्हा खटके उडतात.

म्हणून कित्येक संसार या अवास्तव अपेक्षांमुळे अक्षरशः उध्वस्त झालेले आपण पाहत आहोत. त्यामुळे वास्तवतेचा स्वीकार करायला आपण जितके घाबरू तितक्या अवास्तव अपेक्षा जन्म घेतील. माझ्याही बद्दल एखादा वाईट प्रसंग घडू शकतो आणि तो सगळ्बायांबतीत घडतच असतो. याचाही आपण स्वीकार करायला हवा.

नुसतं चांगलं घडायला हवं. चांगलं घडण्याची अपेक्षा ठेवणं हे काही वाईट नाही. परंतु वाईट जरी घडलं तरी त्यातून चांगलं घडवण्याची तयारी सुद्धा ठेवायला हवी. मग जी काही चांगली अपेक्षा आहे त्याचा त्रास होणार नाही.

साभार आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: