विधवा वहिनीसोबत दिराने थाटला संसार, साऱ्या गावाने केले कौतुक!

 

कोरोनाच्या महामारीत अनेक संसार उद्धवस्त झाले तसेच अनेक महिला ह्या विधवा झाल्या होत्या. कोरोनाच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे विधवा झालेल्या आपल्या वहिनाला दिराने जिवनभराची साथ देण्याचा आदर्श निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दिर भाऊजाईचा सामाजिक आदर्श घालून देणारा विवाह नुकताच संपन्न झाला आहे.

कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार केला. ढोकरी येथील निलेश शेटे यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांना ३ वर्षांची एक मुलगीही आहे.तरुण पत्नी पुनम अवघी २४ वर्षांची असताना कोरोनाने पतीला हिरावले. त्यामुळे पुनमसमोर जिवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता.

गावातील ज्येष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेतला आणि लहान दिर समाधान याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर समाजाची सर्व बंधने झुगारून अखेर दोघांचा विवाह पार पडला. या विवाहाची संपूर्ण राज्यभरात चर्चा होत असून शेटे परिवाराच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Team Global News Marathi: