देगलूर बिलोलीची जनता भाजप काँग्रेसला धूळ चारणार, वंचित उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी व्यक्त केला विश्वास

 

देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपा पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी सुद्धा मैदानात उतरली असून डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. देगलूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या इंगोले यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे इंगोले यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या अडचणी वाढणार आहे. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना देगलूर बिलोलीची जनता धूळ चारेल, असा विश्वास देगलूर बिलोली पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी व्यक्त केला.

लोकसभेला काँग्रेस आणि भाजपला जसा नांदेडमध्ये आम्ही दणका दिला होता तसाच दणका आताही आम्ही देऊ. गेल्या अनेक वर्षांपासून मी मतदारसंघात काम करतोय. सेवेचं फळ मला तिकीटाच्या रुपात मिळालं आहे. आता उरलेलं काम जनता करेल. मला विश्वास आहे की काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना देगलूर बिलोलीची जनता धूळ चारेल, असा विश्वास देगलूक बिलोली पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून बिलोली-देगलूरमध्ये विकासाची गंगा वाहिलेली नाही. प्रस्थापितांकडून इथे फक्त राजकारण केलं जातं. पण आता जनतेला वंचितच्या रुपाने चांगला पर्याय आहे. जसा दणका लोकसभेला प्रस्थापितांना दिला तसाच दणका जनता आताही दोन्ही पक्षांना देईल आणि प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करुन वंचितला निवडून देईल, असा विश्वास डॉ. इंगोले यांनी व्यक्त केला.

Team Global News Marathi: