आनंदाची बातमी:दौंड जवळ उजनी धरणात 11 हजाराचा विसर्ग

पंढरपूर- पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात दौंड जवळून ११ हजार ,९२७ क्युसेक विसर्ग मिसळत आहे. यामुळे प्रकल्पाची पाणी पातळी थोड्या प्रमाणात वाढण्यास मदत मिळणार आहे.

भीमा व नीरा खोर्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. याचा जोर आज कमी झाला आहे. उजनीच्या लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने दौंड जवळून आता ११९२७ क्युसेक पाणी मिसळू लागले आहे. काल हा विसर्ग ४३०० क्युसेक होता. इंद्रायणी सह अन्य नदी परिसरात होत असलेल्या पावसाचे हे पाणी आहे. दरम्यान उजनी धरण वजा ५९ टक्के आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: