अभिनेता सोनू सूद यांनी थेट मातोश्री गाठत घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई 7 जून: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद यांनी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रात्री साडे दहाच्या सुमारास ही भेट झाली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सोनू सूद यांना घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत होते. सोनू सूद यांनी विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी खूप मदत केली होती. त्याच मदतीवरून संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप हा सोनू सूदचा बोलविता धनी आहे असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत सोनू सूदने त्यांना तो करत असलेल्या कामाची माहिती दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: