मान्सून परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जयंत पाटील

मान्सून परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जयंत पाटील

ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सांगली जिल्ह्यात उद्भवलेली पूरपरिस्थितीचा अनुभव घेऊन पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजनांसाठी
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्ह्यातील मान्सून पूर्वतयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.संभाव्य पुरस्थिती निर्माण झाल्यास सक्षमतेने हातळण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले .

येणाऱ्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णाकाठच्या लोकप्रतिनिधींना बोलवून त्यांच्यासोबत वडनेरे समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात येईल तसेच संभाव्य पुरस्थिती हातळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, आवश्यक सामुग्री अद्यावत ठेवावी असे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी मंत्री विश्वजित कदम व अधिकारी उपस्थित होते.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटक सरकारमधील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. पुरप्रवर क्षेत्रातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल करण्यात येणार आहे. तसेच गावनिहाय आपत्ती प्रतिसाद पथक तयार करण्यात येत आहेत. या पथकांना एनडीआरएफ मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे किटकनाशके पुरेशा प्रमाणत उपलब्ध करुन द्यावीत. बोगस बियाणेद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही त्याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. पावसाळ्यातील साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा, जनावरांचा लसीकरण करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: