युवासेना सचिन वरुण सरदेसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल

 

मुंबई | भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी आज शिवसेना युवासेनेचे सचिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वरुण सरदेसाई यांच्यावर मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरदेसाई यांच्या अधकनी अधिक वाढताना दिसून येणार आहे.

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शविसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कानशिलात लगवण्याचे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण काल, मंगळवारी चांगलंच तापलं होत. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. तसेच मुंबईतही जुहू येथील नारायण राणे यांच्या बंगल्या जवळ शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

यावेळी छेडण्यात आलेल्या आंदोलनात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे युवासेनेच्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. या आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक, शिवगाळी सुरू केली. आंदोलन खूपचं चिघळले. परिस्थिती हात बाहेर जात असल्यामुळे पोलीस सर्व कार्यकर्त्यांना मागे जाण्यास सांगत होते. मात्र यावेळी वरुण सरदेसाई पोलिसांना शिवीगाळ करताना दिसले. त्यामुळे सध्या वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल करा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून केली जात आहे.

 

Team Global News Marathi: