कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकलं असेल, वैभव नाईक यांचा टोला

 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांना पुन्हा एकदा डिवचनयचा प्रयन्त केला होता. कायदा काय असतो हे कळून चुकलं असेल असं म्हणत आमदार नाईक यांनी टोला लगावला होता. तसेच नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेनेची रस्त्यावरची ताकद काय आहे हे अनुभवलं असेल, असंही नमूद केलं.

नाईक म्हणाले की, मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या पुढे कोणीही नेता, मंत्री मोठा नाही हे ठाकरे सरकारने दाखवून दिले. शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “गेले कित्येक दिवस शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या, शिवसेनेवर विनाकारण टीका करणाऱ्या, शिवसैनिकांना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना आज शिवसैनिकांनी अद्दल घडविली आहे. शांत असलेली शिवसेना वेळप्रसंगी रौद्ररूप धारण करू शकते. यापुढच्या काळातही कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घेण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये आहे. यापुढेही कोण अंगावर आल्यास जशास तसे उत्तर दिले जाणार आहे,” असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

Team Global News Marathi: