युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाने पैसे वसुलीसाठी कंत्राटदाराला कडी लावून कोंडलं

 

नागपूर | एकीकडे सेना मंत्र्यांच्या आणि खासदारणाच्या मागे ईडीची ससेमिरा मागे लागलेली असताना नागपूरमध्ये पक्षाची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. नागपुरातील युवासेनेचे जिल्हाप्रमुख हितेश यादव यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश यादव यांनी पैशांच्या वसुलीसाठी एका कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश यादव यांनी कंत्राटदार अक्षय भांडारकर यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हितेश यादव यांनी त्यांना कोंडूनही ठेवले होते. अक्षय भांडारकर यांनी कृष्णराव एलामपुल्ली यांच्याकडून पैसे घेतले होते. है पैसे त्यांना परत करता आले नव्हते. त्यामुळे एलामपुल्ली यांचे पैसे परत मिळवून देण्याची जबाबदारी हितेश यादव यांनी उचलली. त्यासाठी हितेश यादव यांनी अक्षय भांडारकर यांना खोलीत कोंडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले.

या सगळ्या प्रकारानंतर अक्षय भांडारकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हितेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हितेश यादव यांच्यावर यापूर्वीही खंडणीखोरी आणि धमकीचे आरोप झाले होते. त्यामुळे आता पोलीस आता त्यापाठोपाठ शिवसेना याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Team Global News Marathi: